छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग । महाराजांचा परस्री बद्दल आदर । Digital Infopedia
नमस्कार, आज Digital Infopedia तुम्हला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही असे प्रसंग तुम्हाला सांगणार आहे.त्या प्रसंगातून तुम्हाला कळेल की कसा परस्री चा आदर करावा, आणि कसे दुसऱ्या लोकांबद्दल सुद्धा आपल्याला आदर असावा. आज आपण बघतो की जर एखाद्या व्यक्तीने काम अपूर्ण ठेवले तर काही लोक ते काम पूर्ण करायला संकोच दाखवतात. आपण महाराजांना फक्त 19 फेब्रुवारी ला आठवतात असे Google च्या search records नुसार कळते.
Google च्या Search Trend नुसार छत्रपती शिवाजी महाराज हे नाव फक्त 19 फेब्रुवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त search केले जाते आणि बाकी 11 महिने छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा search graph हा पूर्ण पणे खाली आलेला असतो.यावरून आपल्याला अस कळत की आपण महाराजांच्या विचारांचा आदर घेत नाही फक्त आपण त्यांचे नाव हे आपण किती मोठे शिवभक्त आहोत हे दाखविण्यासाठी वापर करतो.
आपल्याला आपल्या आसपास असे खूप लोक मिळतील जे स्वतः ला शिवभक्त म्हणून घेतात पण तीच लोक शाळा आणि कॉलेज समोर एका कट्टयावर बसून किंवा जिथं मुली किंवा स्त्रिया असतील तिथं हे लोक तुम्हाला Eve teasing (छेडछाड) करतांना दिसतील. यांच्या साठी आणखी एक ठिकाण हे सध्या च्या काळात उपलब्ध झाले ते म्हणजे social media. तुम्ही कोणत्या पण एका मुलीच्या प्रोफाइल मध्ये जा आणि त्यातील काही फोटो किंवा व्हिडीओ चे कंमेंट सेकंशन उघडून बघा. यावरून आपल्याला कळत की आज जर आपण सर्वांनी महाराजांच्या विचारांचे आदानप्रदान केले असते तर कदाचित हे चित्र वेगळं असत.
आज Digital Infopedia तुम्हाला महाराजांच्या जीवनातील असेच काही प्रसंग सांगणार आहे ज्यातून तुम्हाला काही ना काही तरी नक्की शिकायला मिळेल. चला तर बघूया.
- प्रसंग 1 आंध्र चे कामगार यांनी तयार केलेले शिल्प
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले आणि रस्त्यामध्ये आलेले आंध्रप्रदेश मधील श्री शैल्य मल्लिकार्जुन मंदिरामध्ये महाराज दर्शनाला गेले. महाराज मंदिरात गेले असताना त्यांनी मंदिराच्या आसपास चा सर्व प्रदेश बघितला आणि महाराजांच्या लक्षात आले की प्रत्येक मंदिराच्या गोपुराला आत आणि बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो परंतु या मंदिराला जो घाट आहे तो घाट बांधला पाहिजे, म्हणून महाराजांनी तो घाट बांधायचा आदेश दिला.
जेव्हा घाट बांधून पूर्ण झाला तेव्हा महाराज दर्शनासाठी मंदिरामध्ये फिरायला लागले आणि तेव्हा महाराजांना लक्ष्यात आले की, प्रत्येक मंदिराला चार गोपूर असतात पण या मंदिराला तीनच गोपूर दिसतंय, या मंदिराचे चौथे गोपूर हे बांधायचे बाकी आहे. तेव्हा महाराजांनी आंध्र च्या सर्व कामगारांना बोलवून घेतले आणि सांगितलं या मंदिराचे चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, तुमचे जे पैसे होतील ते आम्ही देऊया आणि महाराज हे मोहिमेवर जाण्यासाठी निघाले. तेव्हा आंध्र च्या कामगारांना वाटलं काय राजा आहे. दुसऱ्या राज्याचा राजा आपल्या राज्यात येऊन मंदिराचे काम करायचं सांगतोय.
शैश्रील्य मल्लिकार्जुन मंदिराच्या गोपुर मधील शिवाजी महाराज शिल्प |
आंध्र च्या कामगारांच्या मनात महाराजांनी एक वेगळीच प्रतिमा तयार केली. आंध्र च्या कामगारांनी ठरविलं हा राजा सदैव आपल्या डोळ्यांसमोर राहिला पाहिजे म्हणून त्यांनी मंदिराच्या चौथ्या गोपुरात महाराजांचे स्मारक बनविले. हे स्मारक महाराजांच्या हयातीतले पाहिले जिवंत स्मारक श्री शैल्य मल्लिकार्जुन च्या मंदिरात बनविले होते.
- Read More: Unknown Dark Secrets of Indian Independence ?
- Read More: चीन मधूनच नवीन नवीन आजार का निघतात ?
- प्रसंग 2 छत्रपती शिवाजी महाराज आणि मल्लामा देसाई यांच्यातील लढाई.
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून महाराष्ट्राकडे यायला निघाले. रस्त्यामध्ये कर्नाटक प्रांतात एक छोटी गढी होती महाराजांनी ती गढी जिंकायचे ठरविले आणि तिथं एक काही मावळ्यांची तुकडी पाठविली. या तुकडीचे नेतृत्व दादाजी जाधव यांच्याकडे होते. या गढी चा ठाणेदार होता प्रभू देसाई. मराठ्यांनी या गढी ला वेढा दिला. गढी च्या आतून प्रभू देसाई चा प्रतिकार सुरू झाला. अस म्हणतात ही लढाई 2 महिने चालली.
आता या लढाई मध्ये या गढी चा ठाणेदार प्रभू देसाई हा ठार झाला, आता मावळ्यांना वाटले की आता गढी आपल्या ताब्यात येईल. पण आता गढी लढविण्याची सर्व सूत्रे ही प्रभू देसाई ची पत्नी सावित्रीबाई देसाई उर्फ मल्लमा देसाई यांच्याकडे आली. मल्लमा देसाई ने ठरविले माझ्या पतीची हत्या केली म्हणून मी मराठ्यांकडून सूड घेईल. मल्लमा देसाई इतकी रागात होती की जो मराठा समोर येईल त्याला एक तलवारीच्या वारात कापत होती.
दादाजी जाधव आणि मल्लमा देसाई च्या चकमकीत मल्लमा पराभूत झाली. दादाजी आता मल्लमा ला महाराजांच्या समोर नेण्यासाठी निघाले तशी मल्लमा थांबा म्हणाली आणि आत गेली आणि तिचे तान्हे बाळ घेतले आणि दादाजी सोबत महाराजांच्या दरबारात आली. मल्लमा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर होती. मल्लमा ला वाटले जसा प्रत्येक राजा त्याच्या शत्रु ला शिक्षा देतो तसा हा राजा पण मला आणि माझ्या बाळाला शिक्षा देईल.
मल्लमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आली आणि हात जोडून विनंती करू लागली, "राजं मी तुमची दोषी आहे राजं", "जी शिक्षा द्यायची ती मला द्या राजं" पण माझ्या तान्ह्या बाळाला सोडून द्या राजं. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व ऐकून स्मित हास्य करू लागले आणि महाराजांनी चिटणीसांना इशारा केला, चिटणीस आत गेले आणि एक दुधाची वाटी घेऊन आले. महाराजांनी मल्लमा देसाई च्या बाळाला स्वतः च्या जवळ घेतलं आणि स्वतः च्या मांडीवर बसवून खेळवू लागले. महाराजांनी दुधाची वाटी घेतली आणि चमच्याने त्या तान्ह्या बाळाला दूध पाजू लागले.
छत्रपती शिवाजी महाराज बाळाला दूध पाजतांना म्हणाले हा जो आमच्या मांडी वर बसलाय ना तो आमचा भाचा आहे आणि तुमची आमच्या बघिनी आहात आणि कोणता भाऊ आपल्या बघिणीचं राज्य बळकावून घेतो. महाराज दादाजींना म्हणाले दादाजी “ बघिणीचं राज्य घ्यायचं नसत बघिणीला राज्य द्यायचं असत ” महाराजांनी मल्लमा देसाई ला त्यांनी जिंकलेली गढी परत दिली आणि त्या बाळाचा संपूर्ण खर्च हा स्वराज्यतून सुरू केला आणि मल्लमा देसाई ला परत त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या अगोदर त्यांचा साडी आणि चुडा देऊन सन्मान केला.
|
Read More: Reason for emergency in India 1975 ?- Read More: भूत प्रेत खरच असतात का ?
- प्रसंग 3 रांझ्याच्या पाटील ला शिक्षा
रांझ्याच्या पाटील ने एका विधवा मुलीचा बलात्कार केला. त्यामुलीने स्वतः च्या अब्रू ची लक्तरे झालेली बघितली आणि विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली आणि महाराजांनी आदेश दिला त्या पाटील ला पकडून आमच्यासमोर हाझिर करा. मावळ्यांनी रांझ्याच्या पाटील ला महाराजांच्या समोर उभे केले. महाराजांनी शिक्षा सुनावली याचे दोन्ही हात पाय कापा,याचा चौरंग करा आणि चौकात बसवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांकडे बघितलं आणि म्हणाले आऊसाहेब दिलेली शिक्षा योग्य की अयोग्य.
तश्या आऊसाहेब म्हणाल्या शिवबा याचं पापच इतकं मोठं, तुम्ही याला मृत्यु दंड द्यायला हवा होता, तुम्ही याला चौरंग करून चौकात का बसविले ? तसे महाराज म्हणाले मी जर याला मृत्यू दंड दिला असता तर याचा विषय इथंच संपला असता, मी याला चौरंग करून चौकात याच्यासाठी बनविले की येणाऱ्या जाणाऱ्या ला कळू द्या की या स्वराज्यात स्री च्या पदराला सुद्धा हात लावला तर त्याचा रांझ्याचा पाटील केला जाईल.
- प्रसंग 4 छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रतिम सुंदरी गौहर बानू प्रति आदर
सन 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण दुर्गांवर विजय मिळविला. त्या काळाच्या परंपरेनुसार विजयी राजाचा हक्क हा जिंकलेल्या राज्यांच्या बायकांवर ही असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर हिंदू ना खूप विश्वास होता. महाराज कल्याण दुर्ग जिंकले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुभेदार सोनदेवने पराभूत झालेल्या कल्याण दुर्गच्या मुस्लिम सुभेदाराची सून गौहर बानू यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात महाराजांसमोर उभे केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात गौहर बानू |
त्या पर स्त्री ला बघताच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदार सोनदेव यांच्या कृत्याची सुभेदाराच्या वतीने गौहर बानूंची माफी मागितली पण गौहर बानूंच्या सौंदर्याला बघून छत्रपती शिवाजी महाराज एवढेच म्हणाले की "आमच्या मातोश्री आपल्या एवढ्याच सुंदर असत्या तर आम्ही पण सुंदर झालो असतो". असे म्हणून गौहर बानू यांना मुक्त करून त्यांना साडी आणि चुडा देऊन आदरानं त्यांची पाठवणी केली गेली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वागणुकीमुळे त्यांनी हे जगास दाखवून दिले की ते इतर बायकांना पण आपल्या मातेप्रमाणे मानत असून त्यांच्या मनात बायकांसाठीचे आदर दाखवून दिले. या घटनेनंतर हिंदूच नव्हे तर मुस्लिमांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यांवर विश्वास बसला.
- Read More: प्रेम म्हणजे नक्की काय ?
- Read More: तुमच्या वर जर कोणी खोटी FIR केली तर तुम्ही काय कराल ?
मित्रानो महाराजांच्या विचारांचे आदानप्रदान करा त्यांच्या फोटो आणि व्हिडिओस चे नाही, फक्त महाराजांचे स्टेटस लावून तुम्ही शिवभक्त नाही बनणार, एका पर स्त्री ने महाराजांचे सैन्य आणि घोडे, शस्त्र यांचे प्रचंड नुकसान केले. तरी पण महाराजांनी त्या स्त्री ला माफ करून तिला आदर सन्मान दिला. पण आज च्या नवीन युगात जर का कोणत्या मुलीने एखाद्या मुलाला त्याच्या चुकीच्या वर्तनाला बरोबर उत्तर जर दिले तर तो मुलगा त्या मुलीच्या उत्तराला त्याच्या अपमान समजतो आणि त्या मुलीला शिव्या देतो आणि काही वेळेस तर बदला घेण्याच्या भावनेत मोठे मोठे गुन्हे हे घडतात. आम्ही असं म्हणत नाही कि सर्व जण असे असतात पण जर का तुम्ही स्वतः ला शिवभक्त म्हणून घेत आहेत तर तुमच्या मध्ये महाराजांचे हे गुण असणे आवश्यकत आहे.
जर फक्त १९ फेब्रुवारी आली कि तुमच्यामधील शिवभक्त बाहेर येत असेल तर असल्या भक्ती ला तुम्ही शिवभक्ती असं नाही म्हणू शकत. महाराजांचे जितके विचार तुम्हाला स्वतः च्या आचरणात आणता येत असतील तितके आणा , आज याच महाराष्ट्रात प्रत्येक तासाला १ ते १० महिला या कोणत्या न कोणत्या अत्याचाराला सामोरे जात आहेत. हे सर्व बघून इतकंच वाटत जर महाराज आज हे बघत असते तर ते एकच म्हणाले असते " अरे कुठं नेऊन ठेवलय स्वराज्य" ज्या स्वराज्याचा पाया हा स्री रक्षणावर आधारित होता त्याच स्वराज्यात आज स्री ही सुरक्षित नाही.
मित्रानो माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेकशन मध्ये कळवा, तुम्हाला जर आश्चर्यचकित करणारे फॅक्टस माहिती करायचे असतील तर आजच आमचे इंस्टाग्राम पेज "अद्भुत तथ्य मराठी" ला फॉलो करा.
0 Comments